डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:46 IST2021-07-07T18:46:25+5:302021-07-07T18:46:48+5:30
Murder Case : या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा
कासारशिरसी (जि. लातूर) : जमिनीच्या वादातून निलंगा तालुक्यातील डोंगरगाव येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, सुभाष धोंडिबा बिराजदार (६०, रा.डोंगरगाव, ता.निलंगा) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, बुधवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास डोंगरगाव येथील आरोपी सचिन बिराजदार, सदाशिव बिराजदार, वामन बिराजदार, स्वप्निल बिराजदार या चौघांनी संगनमत केले. जमिनीच्या वादातून काट्या- लोखंडी सळई, दगडाने सुभाष धोंडिबा बिराजदार यांना मारले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचा मुलगा रुक्मांगध बिराजदार यांच्या फिर्यादीवरून कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, एपीआय रेवनाथ ढमाले यांनी भेट घेऊन पाहणी केली. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, एक जण फरार आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे हे करीत आहेत.