"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:00 IST2025-10-11T19:59:33+5:302025-10-11T20:00:40+5:30
Husband Wife Crime: दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याला अटक झाली, ती पैसे चोरल्याच्या प्रकरणात पण जेव्हा त्याची जुनी कुंडली पोलिसांनी पाहिली, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला.

"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
दिल्लीतील जंगपुरा भागात चोरीची घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपी सापडला. ५२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जेव्हा त्याचे नाव पोलिसांना कळले, तेव्हा त्यांनी त्याच्या जुन्या गुन्ह्याची माहिती घेतली आणि धक्काच बसला. ३० लाखांची चोरी करणारा आरोपी १३ वर्ष शिक्षा भोगून बाहेर आलेला निघाला, तेही पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद नजरान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २००७ मध्ये पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. १३ वर्ष तुरूंगवास भोगल्यानंतर तो २०१९ मध्ये बाहेर आला होता.
दरवाजाचे कुलूप तोडले, ३० लाखांची चोरी
दिल्लीतील एक भाग आहे जंगपुरा. येथीलच एक रहिवासी जुनैद खानने २१ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घरातून ३० लाखांची चोरी झाली होती.
जुनैद खान हे घरी आले तेव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. सोन्याचे दागिने, १६०० कतार रियाल, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांनी पाहिले. हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला.
पोलिसांना मिळाला एक सीसीटीव्ही व्हिडीओ
गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यात दोन संशयित मध्यरात्री तक्रारदार व्यक्तीच्या घरात घुसताना दिसले. पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला. दरियागंज परिसरापर्यंत त्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला गेला आणि नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. जामा मशिद परिसरात आरोपी मोहम्मद नजरान याला अटक केली. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. त्याच्याकडे चोरीचे एक लॉकेट मिळाले.
चोरीनंतर दागिने कुणाला दिले?
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्याने सांगितले की, अरमानसोबत मिळून चोरी केली. त्यानंतर अरमानच्या मेहुण्याला सोन्याचे दागिने दिले, जो गोकुळपुरीमध्ये सोनार म्हणून काम करतो. अक्षय चोरीचे दागिने वितळवायचा आणि विकायचा.