सांगलीत धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; संशयित पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 23:15 IST2022-03-22T23:13:23+5:302022-03-22T23:15:19+5:30
रोहन हा पेंटींगचे काम करत होता. सायंकाळी तो घरात बिर्याणीसाठी साहित्य आणतो, असे सांगून बाहेर पडला.

सांगलीत धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; संशयित पसार
सांगली- शहरातील आंबेडकर रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास चारजणांनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केला. रोहन रामचंद्र नाईक (वय २९, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभरफुटी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रोहन हा पेंटींगचे काम करत होता. सायंकाळी तो घरात बिर्याणीसाठी साहित्य आणतो, असे सांगून बाहेर पडला. आंबेडकर रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये तो मित्रासह बसला होता. याच वेळी संशयितही त्याच हाॅटेलमध्ये होते. त्यांच्यात वाद झाला. हाॅटेलबाहेर वाद मिटविण्यात आला. पण नंतर संशयितांनी रोहनवर पाठीमागून धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले.
यानंतर, रोहनला उपचारासाठी सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये हलविण्यात आले. पण डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खूनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.