कुपवाडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 18:20 IST2020-07-10T18:18:42+5:302020-07-10T18:20:01+5:30

खूनानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली आहेत.

Murder of NCP District Vice President in Kupwad, accused are absconding | कुपवाडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार  

कुपवाडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार  

ठळक मुद्देदत्तात्रय पाटोळे हे  राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा या पदावर आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचे एका कारखान्यात कामगार पुरवठा करण्याचा ठेका होता. पाटोळे यांच्या खूनाची घटना समजताच नातेवाईकांनी व काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला.ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. खूनानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली आहेत.
     

दत्तात्रय पाटोळे हे  राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा या पदावर आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचे एका कारखान्यात कामगार पुरवठा करण्याचा ठेका होता. आज दुपारी बाराच्या सुमारास पाटोळे हे एमआयडीसीकडून  कामगारांचा पगार देऊन मोटारसायकलवरून घरी चालले होते. त्यावेळी अशोका हाॅटेलसममोर त्याला हल्लेखोरानी गाठले. यावेळी पाटोळे हे खाली पडले. त्यानंतर हल्लेखोरानी त्याच्यावर वार केले. त्यानंतरही पाटोळे हे आपला जीव वाचवण्यासाठी तेथील रोहीणी कोल्ड स्टोअरमध्ये घूसले. परंतू हल्लेखोरानी आत जाऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर वार झाल्याने डोक्याची कवठी फूटली आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
    

पाटोळे यांच्या खूनाची घटना समजताच नातेवाईकांनी व काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांनी आक्रोश केला.खूनी हल्लेखोर दोन ते तीन जण असल्याची चर्चा घटनास्थळी होती.खूनाची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपसिंह गिल, सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

 

कोरोनाबाधित रुग्णांची नावे जाहीर करण्याची मागणी कशासाठी? याचिकाकर्त्याला न्यायालयाचा उलट सवाल

Read in English

Web Title: Murder of NCP District Vice President in Kupwad, accused are absconding