शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पालिकेने उचलला कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:50 PM

भाजपासह काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या फलकांवर कारवाई केली गेली.

ठळक मुद्देमीरारोड भागातील ६० पेक्षा जास्त बेकायदा फलक काढून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली गेली. आयुक्त खतगावकर यांनी अखेर गोडसेंना कारवाईचे आदेश दिल्यावर त्यांनी कारवाई केल्याचे सुत्रांनी सांगितले.

मीरारोड - महापालिकेच्या मीरारोडचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्यावर राजकारण्यांचे आचार संहिता भंग करणारे बेकायदेशीर जाहिरात फलकांना संरक्षण दिल्याने निलंबित करण्याच्या तक्रारी थेट निवडणुक आयोगापर्यंत झाल्याने अखेर गुरुवारी रात्री मीरारोड भागातील ६० पेक्षा जास्त बेकायदा फलक काढून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली गेली. भाजपासह काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या फलकांवर कारवाई केली गेली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना देखील मीरारोडच्या शांती नगर भागातील महापालिकेच्या ताब्यातील मैदानांमध्ये सर्रास बेकायदेशीर राजकीय प्रचारांचे फलक लावण्यात आले होते. धार्मिक उत्सव तसेच महापालिकेच्या ताब्यातील मैदान असुन देखील कोणतीच परवानगी न घेता मोठ्या संख्येने सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, नगरसेवक - पदाधिकारी यांचे जाहिरात फलक, कमान लावण्यात आले होते.परंतु प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे मात्र नवरात्रीला ५ दिवस उलटले तरी या पालिका ताब्यातील मैदानांमध्ये लागलेल्या बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्यास टाळटाळ करत होते. या प्रकरणी अनेक तक्रारदारांनी थेट निवडणुक आयोगापर्यंत याच्या तक्रारी करुन गोडसे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर आणि पालिका अधिकारी हे स्थानिक सत्ताधारी भाजपाच्या राजकिय व आर्थिक फायद्यासाठी सातत्याने काम करत असल्याने ते आचार संहितेचे काटेकोर पालन करणार नाहीत अशा असंख्य तक्रारी नागरीकांनी आयोगासह शासनाकडे चालवल्या होत्या.मैदानांमधील मोठ्या संख्येने लागलेल्या बेकयदेशीर जाहिरात फलकांप्रकरणी अडचणीत आल्यानंतर अखेर गोडसे यांनी गुरुवारी रात्री ८ वा. आपल्या पथकासह मीरारोड भागातील बेकायदा फलकांवर कारवाई सुरु केली. मीरारोड रेल्वे स्थानकासमोरील शांती शॉपींग सेंटरच्या आवारात आम आदमी पार्टीचे उमेदवार नरेंद्र भंबवानी यांचे छायाचित्र असलेले प्रचारांचे लहान २३ बॅनर पालिकेची परवानगी नसल्याने ते काढण्यात आले. नया नगर, शांती नगर परिसरात काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांचे छायाचित्र असलेले प्रचाराचे २१ ठिकाणी असलेले जाहिरात फलक गोडसे व पथकाने काढले. तर शांती नगर सेक्टर ३ च्या मैदानात भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांनी आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवात भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारायांचे लहान मोठे १८ जाहिरात फलक लावण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आले. या प्रकरणी जाहिरात फलक लावणाराया अनोळखीं विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, महाराट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम व भादंसंच्या कलमांतर्गत अनोळखी व्यक्तीं विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अन्य काही भागातील बेकायदा फलकांवर मात्र कारवाई आणि गुन्हा दाखल केला गेला नसल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.परंतु कारवाई आधी गोडसे यांनी मात्र १४५ - मीरा भाईंदर मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांनीच फलकांना परवानगी दिली असल्याचे सांगत त्यांनी परवानगी रदद्द केली तर कारवाई करु असा पावित्रा घेतला होता. परंतु सहाय्यक निर्णय अधिकारी मुकेश पाटील यांनी मात्र, या कार्यालयातुन केवळ नाहरकत पत्र दिले असून त्यामध्ये महापालिका आदी संबंधितांच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे नमूद असल्याचे स्पष्ट करत गोडसे यांचा खोटेपणा उघड केला. आयुक्त खतगावकर यांनी अखेर गोडसेंना कारवाईचे आदेश दिल्यावर त्यांनी कारवाई केल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिसcommissionerआयुक्त