शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

मुंब्रा येथे शिजत होता घातपाताचा कट; नऊ संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:16 PM

एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे. 

ठळक मुद्दे२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही अतिरेकी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले.

मुंबई -  काही तरुण मुंब्रा आणि औरंगाबाद येथे आयसिस या संघटनेशी जोडले गेलेले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार एटीएसने काही आठवडे सतत प्रत्यक्ष व तांत्रिक पातळीवर नजर ठेवली होती. संशयित ताब्यात घेतलेल्या व्यक्ती या २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही अतिरेकी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न होताच एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे. 

एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन  कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहे. आयसिस या आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी टोळी बनविण्याचे व दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट रचून त्या दृष्टीने साहित्याची जमवाजमव केल्याचे निष्पन्न होत असल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा १९६७ कलम १८, २०, ३८, ३९,भा . दं. वि. कलम १२० (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसmumbraमुंब्राAurangabadऔरंगाबादTerrorismदहशतवाद