शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मुंबई पोलीस विभागाला पालिकेने केले 'डिफॉल्टर' घोषित

By पूनम अपराज | Published: July 15, 2019 2:51 PM

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली माहिती   

ठळक मुद्दे पोलीस विभागाकडे पाण्याची तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी पोलीस विभागाचे एकूण ४६६ जलजोडणीला डिफॉल्टर यादीत टाकले असल्याचे उघड झाले आहे.  बृहन्मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालय, पोलीस निदेशक कार्यालय, अनेक पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे, जीआरपी, वाहतूक पोलीस कार्यालय, पोलीस वसाहताचे समावेश आहे.

मुंबई - सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका जलजोडणी खंडित करते. परंतु, महानगरपालिका शासकीय विभागावर महेरबान आहे. कारण या पोलीस विभागाकडे पाण्याच्या तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी आहे. तसेच मुंबई पोलीस विभागालासुद्धा पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले असल्याचे आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी सांगितले.  आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. या माहिती संदर्भात जनसंपर्क माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिलेली आहे. या माहितीत पोलीस विभागाकडे तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी असून पोलीस विभागाचे एकूण ४६६ जलजोडणीला डिफॉल्टर यादीत टाकले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालय, पोलीस निदेशक कार्यालय, अनेक पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे, जीआरपी, वाहतूक पोलीस कार्यालय, पोलीस वसाहताचे समावेश आहे. यापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण ८ कोटींची  थकबाकी होता. तसेच त्या बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले होते. याबाबत वृत्त आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागांनी जवळपास सर्व थकबाकीचे पैसे पालिकेकडे भरण्यात आले आहे.  आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले की, जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनते का भरावे ? तसेच सार्वजनिक बांधकाम विभागसारख्या पोलीस विभागाही पाण्याची थकबाकीचे पैसे भरणार का ? असा सवाल शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताMumbaiमुंबईPoliceपोलिस