Instagram वर मैत्री, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर गँगरेप; मुंबईतला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:58 PM2021-06-06T12:58:46+5:302021-06-06T13:00:38+5:30

पीडित तरूणीचे इन्स्टाग्रामवर अनेक मित्र होते. यातील मालवणी येथे राहणाऱ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने तरूणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं.

Mumbai Police Arrested Six Accused Who Raped Minor After Friendship At Instagram | Instagram वर मैत्री, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर गँगरेप; मुंबईतला धक्कादायक प्रकार

Instagram वर मैत्री, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर गँगरेप; मुंबईतला धक्कादायक प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देआई वडिलांपासून लपून तरूणी पार्टीला गेली. घरातून जाताना तिने स्वत:च्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. जेव्हा मुलगी घरी परतली नाही त्यानंतर कुटुंबाने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली.दुसऱ्या दिवशी १ जूनला पीडित युवती घरी परतली. परंतु तिच्या पोटात खूप दुखू लागल्याचं तिने आईला सांगितलं.

 मुंबई – इन्स्टाग्रामच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या १६ वर्षीय युवतीवर तिच्याच ७ मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मालवणी भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली. जेव्हा पीडित तरूणी मढ येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या जवळ कारमध्ये मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होती. तेव्हा तिच्यावर गँगरेप केल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली असून ७ व्या आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींचे वय १८ ते २३ वयोगटातील आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरूणीचे इन्स्टाग्रामवर अनेक मित्र होते. यातील मालवणी येथे राहणाऱ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने तरूणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं. आई वडिलांपासून लपून तरूणी पार्टीला गेली. घरातून जाताना तिने स्वत:च्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. जेव्हा मुलगी घरी परतली नाही त्यानंतर कुटुंबाने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जूनला पीडित युवती घरी परतली. परंतु तिच्या पोटात खूप दुखू लागल्याचं तिने आईला सांगितलं. घरच्यांनी तिला पोटात दुखल्याचं कारण विचारलं असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मित्रांनी माझ्यावर गँगरेप केल्याचं तरूणीने उघड केले. एकदा नव्हे तर दोनदा तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं पीडितेने पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांचा तपास सुरू

आरोपींपैकी एक तिचा इन्स्टाग्रामचा मित्र होता. तर बाकी तिच्या मित्राचे मित्र होते. मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी चैतन्य एस यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणातील ६ आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.

Web Title: Mumbai Police Arrested Six Accused Who Raped Minor After Friendship At Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस