शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची मुलगी झाली 'जेम्स बॉण्ड'; मोबाईलचोराचा लावला छडा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:59 IST

दादर रेल्वे पोलिसांना तिने पॉंन्डिचेरी एक्प्रेसने प्रवास करणाऱ्या आरोपीला ६ ऑगस्टला बेड्या ठोकण्यास मदत केली

मुंबई - अंधेरी येथील मरोळ परिसरातील विजय नगरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय झीनत हक या मुलीने स्वतः चा चोरलेल्या मोबाईल चोराचा पर्दापाश केला आहे. पोलिसानांप्रमाणे तपास करत तिने तंत्रज्ञानाचा वापर करून चोराच्या मुसक्या अवघ्या २४ तासात आवळल्या आहेत. दादर रेल्वेपोलिसांना तिने पॉंन्डिचेरी एक्प्रेसने प्रवास करणाऱ्या आरोपीला ६ ऑगस्टला बेड्या ठोकण्यास मदत केली आहे. या आरोपीचे नाव सिल्वराम रतन शेट्टी (वय - ३२) असं आहे.  

अंधेरी पूर्वेकडे असलेल्या वंडर किड्स येथे काम करत असून तिचा प्रवासादरम्यान दादर येथून ५ ऑगस्टला रात्री १० वाजताच्या सुमारास मोबाईल हरवला. शिओमीचा रेडमी ४ हा मोबाईल होता. नंतर रात्री घरी गेल्यावर झीनतने जेम्स बॉण्ड बनत तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल अकाउंट तपासून पहिले. तेव्हा चोरट्याने मोबाईलमधील माझे  जीमेल अकाउंट डिलीट न करता वापरत असल्याने त्याचे लोकेशन शोधणं सोयीचं झालं. मला रात्री १०.२३ वाजता मालाड येथील डीमार्टचे लोकेशन तिला सापडले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ ऑगस्टला मालाडचे लोकेशन ट्रेस झाले होते. दरम्यान, मी गुगल ऍक्टिव्हिटी तपासली असता आरोपीने व्हाट्स ऍप, फेसबुक वापरत असल्याचे दिसून आले. तसेच त्याने अभिनेता रजनीकांतच्या काला चित्रपटातील गाणं देखील सर्च केल्याचे ऍक्टिव्हिटीमध्ये दिसले असल्याची माहिती तक्रारदार झीनतने 'लोकमत'शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाची माहिती समोर आली ती म्हणजे आरोपीने रेल्वे तिकीट बुक करण्याचे ऍप डाउनलोड करून पॉंन्डिचेरी एक्प्रेसचे ६ ऑगस्टचे रात्री ९. ३० वाजताचे दादर ते तिरुवण्णामलई असे तिकीट बुक केल्याची माहिती तिला मिळाली. या माहितीचा लगेच फोटो मी काढला आणि सायंकाळी दादर रेल्वे पोलिसांना भेटली अशी माहिती पुढे झीनतने दिली. त्यावेळी दादर रेल्वे पोलिसांनी मला खूप सहकार्य केले आणि आरोपी एक्प्रेस ट्रेनकडे येण्याआधीच मी आणि पोलीस पोचलो. संबंधित स्लीपर डब्याकडे पोहचल्यावर मी माझा मोबाईल ओळखला आणि ज्या व्यक्तीच्या हातात हा मोबाईल आढळला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पहिल्यांदा पोलिसांना आरोपी मी मोबाईल त्याला विकला, दुसऱ्यांदा माझ्या बहिणीने दिला अश्या सबबी सांगू लागला. नंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शेट्टीला ताब्यात घेतले अशी सर्व हकीकत झीनतने 'लोकमत'शी बोलताना सांगितली.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसrailwayरेल्वेAndheriअंधेरीMobileमोबाइलRobberyदरोडा