Mumbai Crime: मुलुंडमध्ये ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:25 IST2022-05-25T15:24:46+5:302022-05-25T15:25:21+5:30
School peon arrested for raping 6-year-old girl : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली.

Mumbai Crime: मुलुंडमध्ये ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक
नवघर पोलिसांनी शाळेच्या आवारात एका ६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५१ वर्षीय शिपायाला सोमवारी रात्री अटक केली आहे. घटनेपूर्वी मुलगी खेळाच्या मैदानावर होती.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली. पोलिसांनी सांगितले की, त्याने तिला बोलावले आणि खोलीत नेले. “आरोपी, हेमंत वैती (51) याने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने याबद्दल कोणाशीही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्याने तिला दिली होती,” असे नवघर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुलगी घरी गेली आणि गप्प बसली. तिच्या आईने तिला तिच्या गप्प राहण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने तत्काळ मुलीच्या वडिलांना कळवले, त्यांनी दोघांनाही नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी नेले. "आम्ही तक्रार नोंदवली आणि आरोपीला अटक केली," असे परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.
वैतीला मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.