बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 12:11 IST2021-09-01T12:10:33+5:302021-09-01T12:11:20+5:30

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ वर्षाआधी या व्यक्तीला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पुन्हा पुन्हा रेप केल्याच्या आरोपात तुरूंगात टाकण्यात आलं होतं.

Mumbai court acquits man in rape case after two years as sister retracts sexual assault charge | बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर

बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर

मुंबईमधून एका रेपबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. इथे एका व्यक्तीला अल्पवयीन बहिणीवर रेप करण्याच्या आरोपात दोन वर्ष तुरूंगात ठेवल्यावर सोडण्यात आलं आहे. पॉक्सो कोर्टात बहिणीने मान्य केलं की, तिने तिच्या भावावर खोटा आरोप लावला होता. त्यानंतर कोर्टाने आरोपी भावाला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.

केसमध्ये समोर आलं मुलीच्या बॉयफ्रेन्डचं नाव

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ वर्षाआधी या व्यक्तीला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पुन्हा पुन्हा रेप केल्याच्या आरोपात तुरूंगात टाकण्यात आलं होतं. मात्र, आता मुलीने खुलासा केला आहे की, तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या सांगण्यावरून भावावर बलात्काराचा आरोप लावला होता. कोर्टात मुलीने सांगितलं की, ती जेव्हाही बॉयफ्रेन्डला भेटायला बाहेर जात होती. तेव्हा तिचा भाऊ तिला रोखत होता आणि मारतही होता. यामुळे ती भावावर नाराज होती आणि बॉयफ्रेन्डच्या सांगण्यावरून तिने भावाविरोधात रेपची खोटी तक्रार केली होती. (हे पण वाचा : सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्...)

२०१९ मध्ये दाखल केली होती तक्रार

अल्पवयीन मुलीने २०१९ मध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या भावाविरोधात लैंगिक शोषणाची केस दाखल केली होती. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरूंगात कैद होता. मुलीने आपल्या तक्रारीत सांगितलं होतं की, ऑगस्ट २०१७ मध्ये तिच्या भावाने तिच्यावर रेप केला होता. त्यावेळी तिचे आई-वडील घरी नव्हते. मुलगी म्हणाली होती की, नोव्हेंबर २०१८ मध्ये भावाने पुन्हा तसाच प्रकार केला.

कोर्टाने मुलगी आणि चौकशी अधिकाऱ्यासहीत दोन साक्षीदारांच्या जबाबावर सुनावणी केली. कोर्टाने सांगितलं की, मुलीचा जबाब विश्वास ठेवण्यासारखा नाही. कारण यात विरोधाभास आहे. मुलीच्या जबाबानंतर कोर्टाने आरोपी भावाला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.
 

Web Title: Mumbai court acquits man in rape case after two years as sister retracts sexual assault charge