शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 5:26 PM

'Mulgi Jhali Ho' fame actor robbed : एका कार चालकाने संमोहित करुन त्याच्याकडून ५० हजार रुपये लुबाडले होते. भानावर येताच योगेशने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली. 

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही दिवसातच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख पटलेली आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ म्हणून गाजलेली भूमिका करणाऱ्या अभिनेता योगेश सोहनीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर काही दिवसांपूर्वी लुटले होते. एका कार चालकाने संमोहित करुन त्याच्याकडून ५० हजार रुपये लुबाडले होते. भानावर येताच योगेशने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी देखील त्याच्या तक्रारीची गांभीर्यानं नोंद घेत चौकशी सुरु केली. महत्वाचे म्हणजे तक्रार केल्यानंतर काही दिवसात पोलिसांनी या गुन्हेगाराला गजाआड केलं आहे. अभिनेता योगेशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. ८ मे रोजी मुंबईतुन पुण्याकडे जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली होती. प्रवास करत असताना एका व्यक्तीने त्याला अडवलं. त्यानंतर त्याला गाडीच्या बाहेर काढून त्याच्यासोबत दमदाटी केली. त्याला संमोहित केलं आणि ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर योगेशने तात्काळ पोलीस तक्रार केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही दिवसातच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख पटलेली आहे.

इस्टाग्रामवरून व्हिडीओद्वारे योगेशने महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याची लूट झाली त्यादरम्यान त्याला अनेकांनी फोन करून विचारपूस केली. या सर्वांचेही आणि मीडियाचे त्याने आभार मानले आहेत. तसेच अशी घटना इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून त्याने एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना सतर्कता बाळगा असं सांगत सर्वांना सावध केलं आहे. 

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर लुटले

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम