एक असं गाव जेथील लोकांचा चोरी करणं आहे व्यवसाय, गावातील लोकांवर ११०० गुन्हे आहेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:49 PM2021-06-16T17:49:23+5:302021-06-16T17:50:24+5:30

जसं झारखंडमधील जामताडा गावाचं नाव सायबर क्राइमसाठी कुख्यात आहे. त्याचप्रमाणे गावाचंही  नाव कुख्यात आहे. जामताडामध्ये तरूण ऑनलाइन फसवणूक करून लोकांना लाखो रूपयांचा चूना लावतात.

MP : 11 hundred cases are registered against the people of kadiyasasi village its name is Kadiyasasi gaon | एक असं गाव जेथील लोकांचा चोरी करणं आहे व्यवसाय, गावातील लोकांवर ११०० गुन्हे आहेत दाखल

एक असं गाव जेथील लोकांचा चोरी करणं आहे व्यवसाय, गावातील लोकांवर ११०० गुन्हे आहेत दाखल

Next

मध्यप्रदेशात एक असं गाव आहे जेथील लोकांचा चोरी करणं व्यवसाय आहे. येथील लोक देशभरात फिरून चोऱ्या करतात. एकट्या या गावातील लोकांवर ११०० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवलेले आहेत. चोरांच्या या गावाचं नाव आहे कडियासासी गुलपेडी गाव. या गावातील लोकांचा शोध मध्यप्रदेशसहीत अनेक रोज्यातील पोलीस करत आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जसं झारखंडमधील जामताडा गावाचं नाव सायबर क्राइमसाठी कुख्यात आहे. त्याचप्रमाणे गावाचंही  नाव कुख्यात आहे. जामताडामध्ये तरूण ऑनलाइन फसवणूक करून लोकांना लाखो रूपयांचा चूना लावतात. या गॅंगमध्ये महिलांसहीत लहान मुलांचाही समावेश आहे. आता मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील कडियासासी गुलपेडी गावातील लोक चोरी करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या शहरात फिरतात. (हे पण वाचा : बहिणीने मेसेज केला '८.५ लाख रूपयांची गरज आहे', महिलेने लगेच पाठवले आणि मग समोर आलं सत्य...)

अप्पर पोलीस अधिक्षक संजय वर्मा यांनी सांगितले की, कडियासासी गावाची लोकसंख्या २५०० च्या आसपास आहे. येथील बोडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सांगितले की, या गावातील लोकांचा व्यवसायच चोरी करणे, लूटमार करणे आणि इतर गुन्हे करणे हा आहे. गावात महिलांना आणि लहान मुलांना ट्रेनिंग दिलं जातं. लहान मुलांकडून चोरी केली जाते आणि महिला रेकीचं काम करतात.

हे लोक उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, हरयाणा, दिल्ली, बंगालसहीत देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील शहरांमध्ये जाऊन चोऱ्या करतात. वर्मा म्हणाले की, या गावातील लोकांना चोरी करण्याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. महिला कपडे विकण्याच्या बहाण्याने रेकी करतात. लहान मुले आणि तरूण लग्न, बॅंका, मोठी दुकाने इत्यादी ठिकाणी जाऊन चोरी करतात. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मिर्झापूरचे पोलीस चोरांना पकडण्यासाठी कडियासासी गावात आले होते. तेथील लोकल पोलिसांनी मिर्झापूर पोलिसांना या गावाबाबत माहिती दिली होती.
 

Web Title: MP : 11 hundred cases are registered against the people of kadiyasasi village its name is Kadiyasasi gaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.