आईच्या अनैतिक संबंधाला मुलीने केला विरोध, जन्मदात्रीनेच प्रियकराकडून घडवून आणला गॅंगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:29 IST2022-06-07T18:28:20+5:302022-06-07T18:29:21+5:30
UP Crime News : मुलीचा आरोप आहे की, तिच्या आईचे अनैतिक संबंध संतोष कुमारसोबत आहेत. तिने अनेकदा दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. पीडितेने जेव्हाही याचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करून गप्प करण्यात आलं.

आईच्या अनैतिक संबंधाला मुलीने केला विरोध, जन्मदात्रीनेच प्रियकराकडून घडवून आणला गॅंगरेप
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये गॅंगरेपची अशी एक संतापजनक घटना समोर आली ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. 16 वर्षीय एक अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, तिच्या आईच्या प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळू तिच्यासोबत गॅंगरेप केला. इतकंच नाही तर पीडितेने असंही सांगितललं की, यात तिच्या आईनेच तिच्या प्रियकराला साथ दिली.
16 वर्षीय अल्पवयीन मुलगी वडिलांच्या मृत्यूनंतर आईसोबतच राहत होती. मुलीचा आरोप आहे की, तिच्या आईचे अनैतिक संबंध संतोष कुमारसोबत आहेत. तिने अनेकदा दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. पीडितेने जेव्हाही याचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करून गप्प करण्यात आलं.
पीडितेने घटनेची माहिती देताना सांगितलं की, 20 मे रोजी तिचा आईचा प्रियकर संतोष दोन इतर लोकांसोबत घरी आला होता. ते आल्यावर आईने तिला चहा करण्यास सांगितलं. जेव्हा ती चहा करण्यासाठी किचनकडे गेली तेव्हा आई घराबाहेर जाऊन दरवाजा बंद करून घेतला. पीडितेनुसार त्यानंतर घरात असलेल्या संतोष, आकाश आणि कन्हईलाल नावाच्या आरोपींनी तिच्यासोबत गॅगरेप केला.
पीडितेने सांगितलं की, जेव्हा तिघेही घरातून गेले तेव्हा आरोपींपैकी एक आकाशसोबत तिचं लग्न लावून देण्याबाबत तिची आई बोलली. पीडितेने काही दिवसांपूर्वीच याची माहिती आपल्या काकूला सांगितली. तेव्हा 25 मे रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसात तक्रार देऊनही कारवाई झाली नाही तेव्हा तिने पुन्हा एकदा 31 मे रोजी या घटनेची लिखित तक्रार जिल्ह्याच्या एसपीकडे केली. घटनेला इतके दिवस झाले असूनही पीडिता आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी भटकत आहे. जेव्हा या घटनेची माहिती मीडियाला मिळाली तेव्हा पोलिसांनी चौकशी केल्यावर कारवाई करू असं सांगितलं.