आईसह मुलाची रेल्वेखाली येऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 22:43 IST2019-05-17T22:43:15+5:302019-05-17T22:43:58+5:30

अखेर पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mother with son committed suicide by comes under train | आईसह मुलाची रेल्वेखाली येऊन आत्महत्या

आईसह मुलाची रेल्वेखाली येऊन आत्महत्या

नालासोपारा - विरार येथील राहणाऱ्या पत्नीने मुलासह डिसेंबर महिन्यात रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केल्याप्रकरणी रेल्वेपोलिसांनी कागदपत्रे पाठवल्यानंतर विरार पोलिसांनी गुरुवारी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. 

विरार पूर्वेकडील गणपती मंदिराजवळील साईराम अपार्टमेंटच्या रूम नंबर ए/415 मध्ये अनिल धामणकर (27) हे पत्नी वृंदा उर्फ अंतरा (24) आणि मुलगा शौर्य (2) यांच्यासोबत राहत होते. अनिल आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्यामुळे वृंदा उर्फ अंतरा हिने मुलगा शौर्यसह 14 डिसेंबर 2018 साली विरार ते वैतरणा दरम्यान रेल्वेच्या खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. वृंदा यांचे वडील विठ्ठल गंगाराम निर्मल (58) यांनी गुरुवारी विरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mother with son committed suicide by comes under train