तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:42 IST2025-11-12T18:39:19+5:302025-11-12T18:42:12+5:30
पत्नीला रील्स बनवण्याचा छंद होता. तिच्या रील्सचा विषय देखील 'पती' होता. मग असं काय झालं?

तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
पत्नीचं अफेयर पतीला कळल्याने तिनेच त्याला यमसदनी धाडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे. मेरठ जिल्ह्यातील एका शेतात पुरुषाचा मृतदेह आढळून आला, या व्यक्तीला गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला असता, मृताच्या पत्नीने विलाप करण्यास सुरुवात केली. तीचं रडणं पाहून, या सगळ्यामागे तिचाच हात असेल अशी कल्पनाही कुणी केला नसेल. सुरुवातील ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याचा कयास बांधला जात होता. मात्र, जसा हा तपास पुढे गेला, तसे वेगळेच सत्य समोर आले.
पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना आढळले की, ती अगवानपूर गावातील तिच्या घरातून बेपत्ता झाली आहे. मृताची पत्नी अंजली ही त्याच गावातील अजय नावाच्या दुसऱ्या पुरूषाशी विवाहबाह्य संबंधात गुंतली होती, हे तपासादरम्यान समोर आले. पोलिसांनी अजयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तोही घरी नव्हता. नंतर दोघे एकत्र लपलेले आढळले. चौकशीदरम्यान अजयने सगळे सत्य कबूल केले.
पत्नीने सांगितलं पतीला मार!
पोलिसांच्या चौकशीत अजयने जे सांगितले, ते अतिशय धक्कादायक होते. अजयने सांगितले की, अंजलीच्या पतीला म्हणजेच राहुलला त्यांच्या अनैतिक संबंधांबद्दल कळले होते आणि यामुळे अंजली इतकी अस्वस्थ झाली होती की, तिने त्याला मारण्याचा कट रचला. नियोजित योजनेनुसार, अजयने राहुलला शेताजवळ भेटण्यासाठी बोलावले. राहुल शेतात आल्यावर अजयने त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या.
कारण काय?
मृत व्यक्ती राहुल आणि त्याची पत्नी अंजली या जोडप्याला तीन मुलं होती. सुरुवातीला त्यांचा संसार आनंदाने सुरू होता. अंजलीला रील्स बनवण्याची खूप आवड होती. ती इन्स्टाग्रामवर रील पोस्ट करायची आणि रीलमध्ये ती नेहमी म्हणायची की, माझा नवरा माझे सर्वस्व आहे, माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. अंजलीचे फॉलोअर्स तिचे रील पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या कमेंट्स करायचे. इंस्टाग्रामवरील अशा कमेंट्समुळे अंजली तिचा नवरा राहुलपासून दूर जाऊ लागली आणि ती अजय नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर, प्रियकरासोबत राहण्यासाठी अंजलीने तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याला यमसदनी पाठवले.