प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:55 IST2023-07-08T12:45:30+5:302023-07-08T12:55:12+5:30

एक महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला सोडलं आणि ती मैत्रिणीसह तिच्या 3 मुलांना घेऊन घरातून गायब झाली.

mother of three children left her husband because of lesbian relations partner in mainpuri | प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला सोडलं आणि ती मैत्रिणीसह तिच्या 3 मुलांना घेऊन घरातून गायब झाली. यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीच्या कुरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हविलिया गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या संजीव यांची पत्नी खुशबू हिची सहा महिन्यांपूर्वी अशोक कुमार यांची मुलगी वंदना हिच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर वंदना सतत खुशबूच्या घरी येऊ लागली. इतकंच नाही तर वंदना खुशबूला तिच्यासोबत बाईकवर फिरायला घेऊन जायची.

खुशबूचा पती संजीव याचा विरोध असायचा. त्याला तिचं घरी येणं आवडत नव्हतं. दरम्यान, 27 एप्रिल रोजी खुशबू तिच्या तीन मुलांसह अचानक गायब झाली. त्याचवेळी वंदनाही तिच्या घरी नसल्याचे कळले. खुशबूचा पती संजीव यांनी कोतवाली कुरवली येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तर दुसरीकडे वंदनाचे वडील अशोक कुमार यांनी बिछवां पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. 

दोघींचे नातेवाईक शोधत असताना अचानक शुक्रवारी म्हणजेच 7 जुलै रोजी वंदना आणि खुशबू आपल्या मुलांसह बिछवां पोलीस ठाण्यात पोहोचल्या. स्वतःच्या इच्छेने घरातून पळून गेल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं. सध्या ती दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सूरजपूरमध्ये राहते. ती तेथील एका खासगी कंपनीत कामाला असून तिन्ही मुलेही एकत्र राहत आहेत. या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनीही पोलीस ठाणे गाठलं. 

खुशबू आणि वंदना यांनी आपापल्या घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. खुशबूने पती संजीवसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. वंदनाच्या भावालाही बहिणीला घरी घेऊन जायचं होतं, पण ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. दोघींचं एकमेकींवर प्रेम असून आता आयुष्यभर एकमेकींसोबत राहणार असल्याचं खुशबू आणि वंदना सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother of three children left her husband because of lesbian relations partner in mainpuri