२ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:43 PM2022-01-18T17:43:36+5:302022-01-18T17:43:59+5:30

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती

Mother of 2 children fell in love with FB friend; Husband approves marriage with boyfriend | २ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग...

२ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग...

Next

जमशेदपूर – झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यात एका अजब प्रेमाची गजब कहानी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी एका महिलेला फेसबुकवर अनोळखी युवकाशी बोलता बोलता त्याच्यावर प्रेम जडलं. ही महिला दोन मुलांची आई आहे. ज्यावेळी या महिलेच्या पतीला या घटनेचा सुगावा लागला तेव्हा त्याने जे काही केले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जमशेदपूरहून जवळपास ६० किमी अंतरावर काडाघोडा असं गाव आहे. याठिकाणी संजय महतो यांचं लग्न २०१६ मध्ये नमिता महतो यांच्याशी झालं. या दाम्पत्याची दोन मुलं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असं चौघांचे कुटुंब आहे. संजयची पत्नी गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करु लागली होती. त्यामुळे अनेकदा घरच्या कामांमध्येही तिचे लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे संजय आणि नमिता यांच्यात खटके उडत होते. फेसबुकच्या वापरामुळे दोघांमध्ये भांडणं झालं. संजयने पत्नी नमिताला अनेकदा व्हॉट्सअप चॅट्स करताना पाहिलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण होत होते.

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती. त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर पडू लागल्या. संजयला नमिताच्या हालचालींवर, वागण्यावर संशय आला. नमिताच्या आयुष्यात दुसरं कोणी व्यक्ती आल्याचा संशय संजयला आला. नमिता दुसऱ्या कोणावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत तिला पुढचं आयुष्य घालवायचं आहे असं संजयला कळालं.

प्रियकराला दिली धमकी, मुंबईहून आला नाही तर जीव देईन

नमिता ज्याच्यावर प्रेम करत होती तो मुंबईला राहायला होता. नमिताने तिचा ऑनलाइन प्रियकर सुकराला मेसेज करुन तिच्याकडे बोलावून घेतलं. जर तो भेटायला आला नाही तर जीव देईन असं ती म्हणाली. सुकरा गावाला पोहचला तसं नमिता त्याच्यासोबत निघून गेली. इथं घरातून पत्नी अचानक गायब झाल्याने पती संजयने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांचा तपास सुरु होणार इतक्यात सुकरा आणि नमिता दोघंही गावात आले. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसोबत या प्रकरणाची चर्चा झाली.

संजयने नमिताला खूप समजावलं परंतु ती प्रियकरासोबत जाण्याच्या मागणीवर ठाम होती. कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडणार नसल्याचं नमिता म्हणाली. अखेर गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पंचायतीने त्या दोघांना एकत्रित राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर नमिताचा पती संजयही तयार झाला. परंतु नमितासमोर संजयने अट ठेवली की प्रियकरासोबत पळून जाताना मुलांनाही सोबत घेऊन जा. तेव्हा नमिता आणि तिचा प्रियकर दोघंही तयार झाले.

Web Title: Mother of 2 children fell in love with FB friend; Husband approves marriage with boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app