शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

जन्मदात्या आईनेच पाजले तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 1:49 PM

कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.

ठळक मुद्देआईने ते पिल्याने तिचाही उपचारादरम्यान मृत्यू

नऱ्हे : जन्मदात्या आईनेच तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध पाजून स्वत:ही ते पिल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, गोकुळा शामराव साबळे (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून तिची तीन वर्षांची मुलगी मात्र यातून बचावली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी शामराव राजाराम साबळे (वय २८, शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी, नऱ्हे, मूळ- सिरड, शहापूर, ता. औंढा जि. हिंगोली) याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दारूच्या नशेत शिवीगाळ व हाताने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने कंटाळून जाऊन रागाच्या भरात उंदीर मारण्याचे औषध पिण्यास प्रवृत्त करून आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून मृत महिलेचा भाऊ कुंडलिक भुरके (वय २८, रा. भोळवा, ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला गोकुळा व शामराव यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पती शामराव हा येथे एका टँकरवर चालक म्हणून कामास होता. तर गोकुळा या साफसफाईचे काम करीत असत. * शामराव याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत. १९ आॅगस्ट रोजी पती शामराव हा नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता कामावरून दारू पिऊन घरी आला. * कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.त्यानंतर तो घराबाहेर निघून गेल्यावर तिने घराजवळील मेडिकलमधून उंदीर मारण्याचे औषध घेऊन घरी आली. औषधाच्या पुडीतील काही पावडर तिने स्वत: खाल्ली व स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलीलाही दिली. * उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने उलट्या होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नऱ्हे 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस