नाशिकमधील भगूर येथे गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:45 IST2022-05-31T12:44:40+5:302022-05-31T12:45:15+5:30

Nashik: नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mother & daughter commits suicide by jumping under Gitanjali Express at Bhagur in Nashik | नाशिकमधील भगूर येथे गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या

नाशिकमधील भगूर येथे गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या

नाशिक - नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अनिता बाळासाहेब शिरोळे व त्यांची मुलगी राखी बाळासाहेब शिरोळे असे आत्महत्या केलेल्या माय लेकीच नाव आहे.या दोघीही बार्न्सस्कूलजवळ, मल्हारवाडी, भगूर येथे राहणाऱ्या होत्या.रविवारी   कँम्प येथील एअर फोर्स स्टेशनच्या गेट जवळील पाळदे मळा परिसरात मुबंईकहून नाशिककडे येणाऱ्या गितांजली एक्स्प्रेस खाली उड्या घेत त्यांनी आत्महत्या केली.याबाबत रेल्वे प्रशासनाने देवळाली कँम्प पाेलिसांना माहिती कळविली. त्यानंतर पाेलिसांनी दाखल हाेत मृतदेहांचा पंचनामा केला. दरम्यान, मृत राखी हिचे वडील साेलापूर येथे खासगी ठिकाणी नाेकरीला अाहेत. बार्न्स स्कूलजवळ राखीसह तिची आई, भाऊ, बहीण  व चुलते राहत असल्याचे समजते. या घटनेची माहित तिच्या वडिलांना व कुटुंबाला दिली असता त्यांना धक्का बसला. दाेघींचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर पाेलिस चाैकशी करणार आहेत.त्यांनतर या घटनेचा उलगडा होणार आहे.

Web Title: Mother & daughter commits suicide by jumping under Gitanjali Express at Bhagur in Nashik