Mother of 2 children ran away with boyfriend in chatra Jharkhand panchayat punished couple | प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

'जब प्यार किया तो डरना क्या' तुम्ही हा डायलॉग तर नक्कीच ऐकला असेल. मात्र, झारखंडच्या एका प्रेमी युगुलाला प्रेम करणं आणि पुन्हा गावात परत येणं चांगलंच महागात पडलं आहे. चतरा या गावातील दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. इतकेच नाही तर महिला आधीच विवाहित असूनही दोघांनी लग्नही केलं.

इथपर्यंत तर सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा पळून गेल्यावर आणि लग्न केल्यावर एक वर्षांनी जेव्हा दोघे गावात परतले तेव्हा तिथेच नाही तर आजूबाजूच्या गावातही एकच गोंधळ उडाला. घाईघाईत चार गावातील लोकांनी पंचायत बोलवली आणि पती-पत्नीला शिक्षा सुनावली. दोघांना गाव सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा यानेही मन नाही भरलं तर गावातील महिलांनी आधी तरूणाने तर नंतर महिलेचे केस कापण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

महिलेच्या या वागण्याने तिचा पती इतका संतापला होता की, त्याने पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर पंचायतने पती-पत्नीला गाव सोडून जाण्याचा आदेश दिला. गावात राहणाऱ्या राजेश भुईयांने गावातीलच विशेश्वर भुईयांची पत्नी बबीता देवीसोबत फरार झाला होता. ती दोन मुलांची आई आहे. आरोपी महिलेला घेऊन साधारण १ वर्षापर्यंत फऱार होता. जेव्हा गावातील लोकांना याबाबत समजलं तर त्यांनी त्यांच्या बहिष्कार घातला. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

पंचायतने त्यांना शिक्षा सुनावताना हेही सांगितले की, गावात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. यादरम्यान काही लोक संतापले आणि त्यांनी दोघांचं टक्कल करून त्यांना चपलांचा हार घालून त्यांची धींड काढण्याची मागणी केली होती. तर महिलेच्या पहिल्या पतीने तिच्या दुसऱ्या पतीच्या वडिलांना भर लोकांमद्ये बेदम मारहाण केली.
 

Web Title: Mother of 2 children ran away with boyfriend in chatra Jharkhand panchayat punished couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.