UP : Groom make high voltage drama when getting apache bike instead of bullet in dowry | बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...

बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...

लग्नात मुलीकडच्या लोकांकडून हुंडा घेण्याची वाईट प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. या विरोधात अनेकदा आवाजही उठवला जातो. पण आजही समाजात अनेकजण हुंडा घेतात आणि हुंड्यासाठी सूनांना त्रासही देतात. हुंडा दिला नाही तर अनेकजण तमाशाही करतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणाला हुंड्यात बुलेट गाडी मिळावी अशी इच्छा होती. पण त्याला बुलेटऐवजी अपाचे बाइक मिळाली. त्यानंतर त्याने जो काही ड्रामा केला तो पाहून वरातीतील सगळे लोक हैराण झाले.

ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील. असे सांगितले जात आहे की, अलीगढजवळ क्वार्सी येथे राहणारी व्यक्ती जी शिपाई आहे त्याचं लग्न हाथरसमध्ये ठरलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे हे लग्न १० लाखात ठरलं होतं. म्हणजे १० लाख हुंडा दिला होता. मात्र, ऐन लग्नाच्या आधी नवरदेवाने एका बुलेटची मागणी केली होती. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

सासरच्या लोकांनी त्याला बुलेटऐवजी अपाचे बाइक दिली. याचा खुलासा लग्नाच्या दिवशी झाला. नवरदेवाला वाटलं होतं की, मुलीकडचे लोक त्याला बुलेट देत आहेत. त्यामुळे तो वरात घेऊन हाथरसमध्ये पोहोचला. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण होतं. अशात कुणीतरी त्याला सांगितलं की, त्याला बुलेट नाही तर अपाचे बाइक दिली जात आहे. 

बस हे समजताच तो भडकला आणि घोड्यवरून खाली उतरला. इतकेच नाही तर त्याने त्यानंतर असा ड्रामा सुरू केला की, लोक बघतच राहिले. रिपोर्टनुसार, आधी त्याने त्याचे कपडे काढले आणि अंडरगारमेंटमध्ये सर्वांसमोर उभा राहिला. असे सांगितले जात आहे की, त्याला कुणीतरी बीअर पाजली होती. त्याने जे केलं त्यावेळी तो नशेत होता. (हे पण वाचा : बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....)

दरम्यान, तो म्हणाला की, जोपर्यंत त्याला बुलेट दिली जात नाही तोपर्यंत तो हा ड्रामा सुरूच ठेवणार आणि लग्न करणार नाही. बराचवेळ हा ड्रामा सुरू राहिला आणि यानंतर कुणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. सूचना मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. पोलीस अधिकारी म्हणाले की, मुलीकडचे लोक जर तक्रार करतील तर केस दाखल केली जाईल. तेच मुलाच्या वडिलांनी हे लग्न होणार नसल्याचं जाहीर केलं. सध्या हा विषय सगळीकडे चर्चेत आहे.
 

Web Title: UP : Groom make high voltage drama when getting apache bike instead of bullet in dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.