व्हिडिओला लाइक करून मिळतील पैसे, तरुणाने गमावले ९ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:47 IST2023-04-25T06:46:39+5:302023-04-25T06:47:15+5:30
तरुणास अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप संदेश आल्यानंतर पैशांसंदर्भात आमिष दाखवून विश्वास संपादन केला

व्हिडिओला लाइक करून मिळतील पैसे, तरुणाने गमावले ९ लाख
पिंपरी : व्हिडीओला लाइक करा, ठरावीक रक्कम गुंतवून त्याच दिवशी दुप्पट परत मिळवा अशा आमिषातून तरुणाची आठ लाख ९६ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना १२ ते २० एप्रिलदरम्यान घडली. विभोर विनय शुक्ला (३३, रा. थेरगाव) यांच्या तक्रारीवरून लतीशा, फराह, अलीना नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
तरुणास अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप संदेश आल्यानंतर पैशांसंदर्भात आमिष दाखवून विश्वास संपादन केला. लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. टेलिग्रामवर एक ग्रुप जॉइन करण्यास सांगून वेळोवेळी पैसे मागितले.