पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:15 IST2018-10-23T20:15:22+5:302018-10-23T20:15:56+5:30

अनिल सानप असं मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Money betrayed friend; The murder of a friend of 35 million looted him | पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या 

पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या 

ठाणे - सरकारी नोकरी लावण्याची बतावणी करून तब्बल 35 लाख रुपये घेऊन नोकरीस न लावल्याने पैसे लुबाडणाऱ्या मित्राची लॉजवर नेवून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज कल्याणमध्ये घडली आहे. अनिल सानप असं मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कल्याणमध्ये राहणारे अनिल सानप आणि संतोष बरदडे हे दोघे मित्र होते. अनिलने आरोपी संतोषला सरकारी नोकरीस लावण्याची बतावणी करून त्याच्याकडून 35 लाख रुपये लुबाडले होते. पैसे घेऊन बराच काळ लोटला तरीही नोकरी न मिळाल्याने संतोषने अनिलकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. मात्र, अनिलने टाळाटाळ केली असता संतोषला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आपल्या मित्रानेच आपली फसवणूक केल्याने संतोषचा राग आला होता. रागाच्या भरात संतोषने कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बिर्ला कॉलेज परिसरात टय़ुक्स लॉजमध्ये अनिलला बोलवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी संतोष हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिल याने सरकारी नोकरी लावण्यासाठी 35 लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरीही लागली नाही आणि अनिल पैसेही परत देत नव्हता. त्यामुळे आपण ही हत्या केल्याची कबुली संतोषने पोलिसांना दिली. 

Web Title: Money betrayed friend; The murder of a friend of 35 million looted him