आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय मुलीवर दुकानातच केला विनयभंग; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:22 IST2022-03-25T10:21:46+5:302022-03-25T10:22:03+5:30

ठाणे  : आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या श्रीनाथ वाघोळे (वय ५६, रा. वसंत विहार, ठाणे ) याला ...

Molested his own friend's 17-year-old daughter in the shop; Shocking type in Thane | आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय मुलीवर दुकानातच केला विनयभंग; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय मुलीवर दुकानातच केला विनयभंग; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाणे : आपल्याच मित्राच्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या श्रीनाथ वाघोळे (वय ५६, रा. वसंत विहार, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे गुरुवारी पाेलिसांनी सांगितले.

कासारवडवली येथे या मुलीच्या वडिलांनी मोटारकारच्या सुट्या भागांचे दुकान सुरू केले आहे. याच दुकानात आपल्या वडिलांना मदतीसाठी ती आली होती. काही कामानिमित्त आलेल्या वाघोळे याने तिच्या आई-वडिलांच्या भांडणाबाबत तिच्याकडे विचारपूस करण्याचा बहाणा केला. नंतर तिला पकडून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर तिने त्याचा हात झटकून त्याला बाजूला केले. तरीही त्याने पुन्हा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा आराेप आहे.

सदर प्रकारानंतर प्रचंड घाबरलेल्या या मुलीने तिथून जवळच असलेल्या आपल्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम १० आणि १२ नुसार २१ मार्च २०२२ रोजी पीडित मुलीने पालकांच्या मदतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयमाला वसावे यांनी यातील वाघोळे याला अटक केली. त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Molested his own friend's 17-year-old daughter in the shop; Shocking type in Thane