शितपेयातुन गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:22 IST2019-01-28T15:21:48+5:302019-01-28T15:22:20+5:30
ओळखीच्या महिलेस हॉटेलमध्ये बोलावत आरोपीने शितपेयात गुंगीचे औषध टाकुन तिचा विनयभंग केला.

शितपेयातुन गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग
पिंपरी : ओळखीच्या महिलेस हॉटेलमध्ये बोलावत आरोपीने शितपेयात गुंगीचे औषध टाकुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे या आरोपीविरोधात शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेस हॉटेलात बोलावुन घेतले. फिर्यादी महिलेला शितपेयातुन गुंगीचे औषध दिले. नशा येऊ लागताच घरी सोडतो, असे सांगुन महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. मोबाईलमध्ये काढलेले फोटो पतीला पाठवुन देतो, अशी धमकी दिली. पैशाची तसेच शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. अशी फिर्याद पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.