वॉर्डबॉयकडून रूग्ण महिलेचा विनयभंग, खाजगी रूग्णालयातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:04 IST2022-02-22T17:03:06+5:302022-02-22T17:04:07+5:30
Molestation Case : याप्रकरणी वॉर्डबॉय कानादास वैष्णव याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

वॉर्डबॉयकडून रूग्ण महिलेचा विनयभंग, खाजगी रूग्णालयातील धक्कादायक प्रकार
डोंबिवली: उपचार घेत असलेल्या एका 75 वर्षीय महिलेचा एक्स रे काढण्याच्या बहाण्याने वॉर्डबॉयने दोनदा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना डोंबिवली पुर्वेतील एका खाजगी रूग्णालयात 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी वॉर्डबॉय कानादास वैष्णव याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
कानादास हा गेल्या एक वर्षापासून संबंधित रूग्णालयात काम करीत आहे. पिडीत महिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाली होती. एक्स रे काढण्यासाठी तीला रूममध्ये नेले असता कानादासने तिचा विनयभंग केला. हा प्रकार एकदा घडल्यावर पिडीतेला वाटले की चुकून हा प्रकार घडला असावा परंतू दुस-यांदा हा प्रकार घडल्यावर मात्र तीने याची माहीती मुलीला दिली. मुलीने तत्काळ रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत वॉर्डबॉय कानादास विरोधात तक्रार दिली.