अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविराेधात पाेस्काेनुसार गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: July 26, 2023 09:27 IST2023-07-26T09:26:57+5:302023-07-26T09:27:45+5:30

पोलिस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी अरोपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

molestation of a minor girl; A case has been registered as per PASCA in one dispute | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविराेधात पाेस्काेनुसार गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविराेधात पाेस्काेनुसार गुन्हा दाखल

उदगीर (जि. लातूर) : शहरातील मोंढा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा एसटी कॉलनी येथील एका युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी पीडित मुलीच्या घरी घडली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी अरोपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरात मोंढा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरी शिवलिंग गुणवंत पाटील (रा. एसटी कॉलनी, उदगीर) हा मंगळवारी आला हाेता. दरम्यान, घरातच त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी आरोपीविराेधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कविता जाधव या करीत आहेत.

Web Title: molestation of a minor girl; A case has been registered as per PASCA in one dispute