माहिम रेल्वे स्थानकाच्या पुलावर विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 14:37 IST2018-10-16T14:09:07+5:302018-10-17T14:37:20+5:30
पुलावर उभ्या असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींपैकी एकीला या विकृताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.

माहिम रेल्वे स्थानकाच्या पुलावर विद्यार्थिनीचा विनयभंग
मुंबई - नुकतेच विरार - चर्चगेट धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला प्रवाश्यांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा माहिम रेल्वे स्थानकात एका विकृताने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
माहिम स्थानकाच्या फूटओव्हर पुलावर ही घटना घडली. पुलावर उभ्या असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींपैकी एकीला या विकृताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.
धावत्या लोकलमध्ये पुन्हा अश्लील चाळे, आरोपीला चोप देत केले रेल्वे पोलिसांच्या हवाली