धक्कादायक! गतिमंद युवतीवर अत्याचार, सुकळीबाई येथील घटनेने खळबळ; नराधमास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:58 IST2022-08-16T18:55:10+5:302022-08-16T18:58:13+5:30
गतिमंद युवतीच्या घरातील मंडळी शेतात काम करण्यास गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. पीडिताही घरी एकटी असताना आरोपी सूरज शंकर मेकलवार (२४) याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला.

धक्कादायक! गतिमंद युवतीवर अत्याचार, सुकळीबाई येथील घटनेने खळबळ; नराधमास अटक
वर्धा : गतिमंद युवतीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सुकळी बाई गावात १४ तारखेला उघडकीस आली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सावंगी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नराधमास अटक केल्याची माहिती दिली.
गतिमंद युवतीच्या घरातील मंडळी शेतात काम करण्यास गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. पीडिताही घरी एकटी असताना आरोपी सूरज शंकर मेकलवार (२४) याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी थेट सावंगी पोलीस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तत्काळ आरोपी नराधमाचा शोध घेत त्यास अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.