पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:29 IST2018-10-28T17:19:47+5:302018-10-28T17:29:20+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
महादेव एकनाथ गोरे (वय ६५, रा. सैनिक नागरी पतसंस्थेजवळ, दिघी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलीची आई गोरे याच्या घरी धुण्या भांड्याचे काम करते. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुलीची आई मुलीसह धुणेभांडी करण्यासाठी घरी गेली असता गोरे याने घरी असलेल्या अल्पवयीने मुलीचा विनयभंग केला. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
(उर्वरित माहिती थोड्याच वेळात )