Molestation of 12 years old shooter girl | नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी : नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. दि. १४ ते २० मे दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी बालेवाडी संकुलातील व्यवस्थापकास अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमबाजी शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीच्या आजीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रुद्र चनीवार गौडा पाटील (वय २४, रा. साई चौक, पाषाण, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी महिलेची नात नेमबाजीच्या बेसिक कोर्ससाठी बालेवाडी क्रीडा संकुलातील गन फॉर ग्लोरी येथे जात होती. तेथे नेमबाजीसाठी गन हाताळावी लागत होती. त्यासाठी गन देताना आणि घेताना आरोपी रुद्र चनीवर गौडा पाटील अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत होता. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत..


Web Title: Molestation of 12 years old shooter girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.