लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या मोक्काच्या आरोपीला पडली पोलिसांची हातकडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:57 IST2020-06-23T17:56:19+5:302020-06-23T17:57:50+5:30
मागील पाच महिन्यांपासून होता फरार..

लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या मोक्काच्या आरोपीला पडली पोलिसांची हातकडी
पिरंगुट : मागील पाच महिन्यांपासून मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पौड पोलिसांनी त्याच्याच लग्नात त्याला अटक केल्याने या आरोपीच्या हातामध्ये त्याच्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या बेडी बरोबर पोलिसांची ही बेडी पडली.
याप्रकरणी पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०७ व मोक्यातील आरोपी असलेला अक्षय रोहिदास पडळघरे ( वय २३ वर्षे रा.पडळघरवाडी,रिहे ता. मुळशी) हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता. तेव्हा पोलीस त्याच्या मागावरतीच होते.पोलिसांना या आरोपीचे लग्न हे पडळघरवाडी (ता,मुळशी) येथे असल्याची गोपनीय माहिती पौडचे पोलिस हवालदार अब्दुल शेख यांना मिळाली.
तेव्हा या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, हवालदार अब्दुल शेख, बाबा शिंदे, शिपाई सुहास सातपुते, नाईक जय पवार, हवालदार संतोष कुंभार यांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पाठविण्यात आले तेव्हा या पथकाने त्याठिकाणी जात सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली.तेव्हा या अटकेने आरोपीच्या हातामध्ये एकाच दिवशी लगाच्या बेडी बरोबर पोलिसांची ही बेडी पडली.