रात्रीच्या काळोखात मोबाइल चोरणारा चोरटा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:51 IST2018-10-01T16:51:11+5:302018-10-01T16:51:36+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार केशव तकीक, बनकर, भालेराव, धनावडे या पथकाने शोधमोहीम राबवून रात्रीच्या काळोखात घरातील मोबाइल चोरणाऱ्या सागर वाघमारे (वय 19) या तरुणाला शोधून काढले.

रात्रीच्या काळोखात मोबाइल चोरणारा चोरटा गजाआड
मुंबई - रात्रीच्या काळोखात सर्व झोपल्यावर घरात चोरपावलांनी घुसून मोबाइल चोरणारा चोरास टिळकनगर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. पी. एल. लोखंडे मार्गावरील गरीब नगरात सलग दोन रात्री दोन घरांतून मोबाइल चोरीस गेल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आली होती. याची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार केशव तकीक, बनकर, भालेराव, धनावडे या पथकाने शोधमोहीम राबवून रात्रीच्या काळोखात घरातील मोबाइल चोरणाऱ्या सागर वाघमारे (वय 19) या तरुणाला शोधून काढले. देवनार येथे राहणाऱ्या आरोपी सागरकडून पोलिसांनी चोरी केलेले चार मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.