मोबाईल चोरणारी लेडीज गॅंग जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:17 IST2018-07-21T20:15:54+5:302018-07-21T20:17:11+5:30

नागरिकांनी पाठलाग करत चार चोरट्या महिलांचे पितळ केलं उघड 

Mobile Stealing Ladies Gang arrested | मोबाईल चोरणारी लेडीज गॅंग जेरबंद 

मोबाईल चोरणारी लेडीज गॅंग जेरबंद 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुलुंड, भांडुप, नाहूर परिसरात घराचा दरवाजा उघडा दिसला की घरातील सामानावर डल्ला मारणारी टोऴी सक्रिय झाली होती. मुलुंड पोलिसांना अशा चोऱ्या करणाऱ्या चार चोरट्या महिलांना गजाआड करण्यात यश मिळालं आहे. 

जत्रानी मजगुल, मीना चव्हान, अश्विनी पवार, संगीता पवार असं या चार चोर महिलांची नावे असून या महिला नाहूरमधील पाटील वाडी परिसरात काही घरांची रेकी करत होत्या त्यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांना या महिलांचा संशय आला आणि त्यांनी या महिलांचा पाठलाग केला. अखेर शिल्पा गौड या पोलीस कर्मचाऱ्याच्या  मदतीने या तिन्ही महिलांना पकडण्यात आलं आणि त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल  हस्तगत करण्यात आले अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी सांगितलं. तसेच मुलुंड पोलीस सध्या या महिलांनी आतापर्यंत किती चोऱ्या केले आहेत याचा तपास करत आहेत.

Web Title: Mobile Stealing Ladies Gang arrested