MNS activist Murder in Jalgaon | जळगावात मनसे कार्यकर्त्याची हत्या, परिसरात खळबळ

जळगावात मनसे कार्यकर्त्याची हत्या, परिसरात खळबळ

जळगाव - जळगावात सेंन्ट लाँरेन्स जवळ देविदास काँलनीत श्याम दीक्षित या मनसे कार्यत्याची हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. या हत्येमागील कारण कळू शकले नाही. तसेच सरकारी पंच मिळत नसल्याने तीन तासांपासून मृतदेह घटनास्थळी पडून आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम दीक्षित हे शनिवारी रात्री  काव्यरत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री १२.३० वाजता ते घरी आले.त्यावेळी त्यांना मोबाईलवर एक फोन आला. घरुन ते जवळच असलेल्या कृपाळू साईबाबा मंदिराजवळ आले. तिथेच रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

सकाळी रस्त्याने जाणाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील  काही लोकांनी हा प्रकार त्यांच्या घरी कळविला. आई व बहीण धावतच तिथे पोहचल्या. श्यामला पाहून त्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान, पोलील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

Web Title: MNS activist Murder in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.