आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियाचा गैरवापर, अफवा पसरवण्यात व्हॉट्स ॲप, फेसबुकची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:46 PM2020-07-21T21:46:34+5:302020-07-21T21:51:25+5:30

नागपुरात ६  गुन्ह्यांची नोंद, ९ जणांना अटक

Misuse of social media for offensive posts, WhatsApp, Facebook lead in spreading rumors | आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियाचा गैरवापर, अफवा पसरवण्यात व्हॉट्स ॲप, फेसबुकची आघाडी 

आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियाचा गैरवापर, अफवा पसरवण्यात व्हॉट्स ॲप, फेसबुकची आघाडी 

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ५५२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़. नागपूरात असे ११ गैरप्रकार घडले. राज्यभरात अनेक समाजकंटक, उपद्व्यापी मंडळी हे काम करत आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवून त्यांनी सामान्य जनताच नव्हे तर शासन, प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : कोरोना संसर्गाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून त्याला धार्मिक रंग चढवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकारात वाढ होऊ लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ५५२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़. नागपूरात असे ११ गैरप्रकार घडले. मात्र, प्रशासनाने ५ प्रकरण बेदखल केले. तर, ६  प्रकरणात गुन्हे नोंदविले आणि ९ जणांना अटक केली.

राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासात सर्वाधिक अफवा या व्हॉट्स ॲपवरुन पसरविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, सध्या व्हॉट्स अ‍ॅपपेक्षा फेसबुकवरुन अफवांचे पीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे़. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एखाद्या अस्त्रासारखा सोशल मिडियाचा गैरवापर केला जातो आहे.


राज्यभरात अनेक समाजकंटक, उपद्व्यापी मंडळी हे काम करत आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवून त्यांनी सामान्य जनताच नव्हे तर शासन, प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे. नागपुरात कोरोणाच्या संदर्भाने जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्ताच्या संबंधानेही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. नागनदीचे  पाणी घराच्या नळात येणार,  प्रतापनगरात एका मेडिकल स्टोअर्समध्ये तर  पाचपावलीत जनरल स्टोअरच्या संचालकाला, कोराडीत एका कंपनीच्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती. नागपुरात ज्या वेळी  दहा-बारा पॉझिटिव्ह होते त्यावेळी ५६ जणांना  कोरोणाची लागण झाल्याची अफवाही पसरविली होती. इमामवाड्यात लष्कर (मिलिटरी) आल्याचे तर सदरमधील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना कोरोना झाल्याची अफवा समाजकंटकांनी पसरवली होती. त्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली होती. याशिवाय वेगवेगळे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याचेही प्रयत्न केले होते.

सतर्क प्रशासनामुळे आलबेल
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याच्या पहिल्या चरणा पासूनच पोलीस प्रशासन अलर्ट होते. त्यामुळे अफवा पसरवून जातीय तेढ तसेच दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नाला उधळून लावण्यात आले. सायबर शाखेने तातडीने आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करणाऱ्या ९ आरोपींना अटक केली. प्रसार माध्यमातून आवश्यक ती जनजागृती करण्यात आल्याने नागपुरात आतापर्यंत सामाजिक सौहार्द कायम राखण्यात यश मिळाले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

 

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

 

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

Web Title: Misuse of social media for offensive posts, WhatsApp, Facebook lead in spreading rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.