दुष्कर्म! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या बापाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 21:50 IST2018-12-03T21:46:44+5:302018-12-03T21:50:50+5:30
मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या.

दुष्कर्म! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या बापाला अटक
ठळक मुद्देमुंबईतल्या अंधेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहेएन. नगर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला अटक केलीपीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा
मुंबई - पॉर्न पाहून स्वत:च्या अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनीअटक केली आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली आहे. मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या.