धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी केला बलात्कार; मुंबईतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:18 IST2020-08-11T16:17:07+5:302020-08-11T16:18:02+5:30
१५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी केला बलात्कार; मुंबईतील धक्कादायक प्रकार
मुंबई: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात देखील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ५१३ झाली असून एकूण १८,०५० जणांनी जीव गमावला आहे. मात्र एकीकडे सर्वजण कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
१५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे आरोपी 'कंपनीची कार' घेऊन २९ जुलै रोजी संध्याकाळी फिरायला निघाले होते. त्यांनी १५ वर्षांच्या मुलीला कारमध्ये जबरदस्ती बसवले आणि तिला घेऊन गेले.
धावत्या कारमध्येच त्या तिघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला ईस्टर्न फ्री-वेवर सोडून फरार झाले. यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या काकीला सांगितला. यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत जाऊत तक्रार केली. फ्री-वेवरील सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.