कपड्याचा बोळा तोंडात कोंबून शेतात अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:30 IST2021-05-19T21:17:45+5:302021-05-20T11:30:46+5:30
Rape on Minor Girl : याबाबत स्टेशन प्रभारी विवेक तिवारी म्हणाले की, पीडितेच्या अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आहे

कपड्याचा बोळा तोंडात कोंबून शेतात अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली अन्...
बोकारो जिल्ह्यातील उग्रवादग्रस्त भागातील चतरोचट्टी पोलिस स्टेशन परिसरात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. एका लेकीच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात अल्पवयीन पीडिता रात्री आठच्या सुमारास आपल्या गावात लग्नसोहळ्यावरून घरी परतत असताना गावातील राजेश महतो (वय 25) यांनी तिला मागून पकडले आणि कपड्याचा बोळा तोंडात कोंबून तिला शेताकडे नेले. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि याबद्दल कोणाला सांगितले तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलगी घरी गेली तेव्हा तिने प्रथम कोणालाही सांगितले नाही. पण जेव्हा घरातील सदस्यांनी तिच्या कपड्यांना लागलेले मातीचे डाग पाहिले, त्यावेळेची सर्व बिंग फुटले आणि विद्यार्थिनीने घाबरून सर्व सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राजेश महतो हा एका मुलीचा बाप आहे. तो खेड्यातील एका मोठ्या कुटूंबातून आला आहे आणि त्याचा गावात मोठा दबदबा आहे. तसेच पीडित विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहे. विद्यार्थिनीच्या आईने मोठ्या धैर्याने अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी चतरोचट्टी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच, कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तरुण चढला ३३ केव्हीच्या विद्युत खांबावर; ३ तास सुरु होता हायवोल्टेज ड्रामा https://t.co/k7wOjrqVrA
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2021
याबाबत स्टेशन प्रभारी विवेक तिवारी म्हणाले की, पीडितेच्या अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, आरोपीला अटक करण्याबाबत सातत्याने छापेमारी सुरू आहे. तसेच पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी पाठवले आहे. सध्या या घटनेतील आरोपी फरार आहे.