minor girl photo share on social media | अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने गुन्हा  
अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने गुन्हा  

पिंपरी : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचे एकांतातील फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. १६ वर्षीय मुलीच्या भावाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा महादेव जमादार (वय २२, रा. भोसरी, मूळ रा. एकगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची बहीण अल्पवयीन आहे. ही बाब माहिती असूनही आरोपी देवा जमादार याने गेल्या वर्षभरापासून तिचा वारंवार पाठलाग केला. तिच्याशी अश्लिल बोलून प्रेमसंबंधि प्रस्थापित केले. तसेच तिच्या आईलाही धमकावले. अल्पवयीन मुलीचे एकांतातील फोटो सोशल मीडियावर टाकून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: minor girl photo share on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.