लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:11 IST2019-04-12T17:06:13+5:302019-04-12T17:11:55+5:30

फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपी घरगिने याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला.

Minor girl molestation by showing attraction for marriage | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

पिंपरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. यासह लग्न न केल्यास तिचे अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.अमोल घरगिने (रा. रा. सावंतनगर, दिघी, मूळ-बीड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपी घरगिने याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. तिचे अश्लील फोटो काढून ते तिच्या मामाला व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. तसेच अल्पवयीन मुलीचे लग्न माज्यासोबत करुन न दिल्यास अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 
 

Web Title: Minor girl molestation by showing attraction for marriage