Love Marriage Story: वय बसत नव्हते, मुलीने मोठ्या बहीणीच्या नावे केले बॉयफ्रेंडसोबत लग्न; कोर्टात जाताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:59 AM2021-09-18T07:59:00+5:302021-09-18T07:59:41+5:30

Crime News: हरियाणामध्ये धक्कदायक प्रकार समोर आला आहे. त्या जोडप्याने लग्न केले आणि नंतर कुटुंबीयांपासून संरक्षण मिळविण्यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टानेही त्यांना संरक्षण पुरविले. पण नंतर जे घडले ते...

minor girl married with boyfriend on her elder sister's Aadhar Card; went in court for security | Love Marriage Story: वय बसत नव्हते, मुलीने मोठ्या बहीणीच्या नावे केले बॉयफ्रेंडसोबत लग्न; कोर्टात जाताच...

Love Marriage Story: वय बसत नव्हते, मुलीने मोठ्या बहीणीच्या नावे केले बॉयफ्रेंडसोबत लग्न; कोर्टात जाताच...

Next

हिसार : 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या मोठ्या बहीणीच्या आधारकार्डाचा वापर करत प्रियकराशी लग्न केले आहे. हे लग्न रजिस्टरदेखील केले. जेव्हा ते दोघे संरक्षण मिळविण्यासाठी न्यायालयात पोहोचले तेव्हा त्यांचे बिंग उघड झाले. आता त्या दोघांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (minor girl married with boyfriend on her elder sister's Aadhar Card; went in court for security.)

या दोघांनी 3 सप्टेंबरला रिवाज विवाह सेवा संस्थेमध्ये जाऊन लग्न केले होते. मात्र, तरुणीचे वय तेव्हा 16 वर्षे होते. यामुळे तिने आपल्या 21 वर्षीय मोठ्या बहीणीचे आधारकार्ड तिथे जमा केले. यानंतर त्यांनी रजिस्टर लग्न केले. प्रकरण तेव्हा उघड झाले जेव्हा या दोघांना त्यांच्या कुटुंबापासून धोका असल्याचे वाटू लागले. तरुणीने लग्न रजिस्टर करताना आपल्या बहीणीचेच नाव सांगितले. तसेच तिच्याच नावाची सहीदेखील मारली. 10 सप्टेंबरला त्या जोडप्याने सेशन कोर्टात सुरक्षा मागितली. 

न्यायालयाने त्या दोघांना सुरक्षादेखील दिली. परंतू हे करताना मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे देखील नोंदविले जाते. इथे सारा घोळ झाला. मुलीच्या वडिलांनी दुसरेच नाव घेतले जे छोट्या मुलीचे होते. कोर्टात मोठ्या मुलीचे नाव नोंद होते. यामुळे ही मुलगी 16 वर्षांचीच असल्याचे उघड झाले. मुलीला याबाबत विचारले गेले तेव्हा तिच्या पती बनलेल्या बॉयफ्रेंडला तिचे वय माहिती नसल्याचे तिने सांगितले. 

न्यायधीशांनी दिलेल्या निकालाच्या आधारे आता या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी फसवणूक करून लग्न केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: minor girl married with boyfriend on her elder sister's Aadhar Card; went in court for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app