प्रेम संबंधावरुन आदिवासी व्यक्तीवर लघुशंका; सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:45 IST2023-07-20T06:44:10+5:302023-07-20T06:45:10+5:30

या आदिवासी व्यक्तीवर लघुशंका व त्याला मारहाण करण्याचा प्रकार १९ जून रोजी घडला होता

Minor doubts on tribal person; Six people were arrested | प्रेम संबंधावरुन आदिवासी व्यक्तीवर लघुशंका; सहा जणांना अटक

प्रेम संबंधावरुन आदिवासी व्यक्तीवर लघुशंका; सहा जणांना अटक

ओंगोल : एका मुलीशी प्रेमसंबंध असलेल्या आदिवासी व्यक्तीवर काही जणांनी लघुशंका व मारहाण करण्याचा  प्रकार आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल येथे घडला होता. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या आदिवासी व्यक्तीवर लघुशंका व त्याला मारहाण करण्याचा प्रकार १९ जून रोजी घडला होता. त्या प्रकरणातील मन्नाम रामांजनेयुलू हा आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या आदिवासी व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो व रामांजनेयुलू हे बालपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर याआधी ३० गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Minor doubts on tribal person; Six people were arrested