बापरे! मोबाईल दुरुस्तीचा किरकोळ वाद, ग्राहकाच्या छातीत थेट गरम सळईच भोसकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 20:23 IST2021-08-18T20:22:12+5:302021-08-18T20:23:14+5:30
A minor dispute over mobile repair : मानखुर्द मधील घटना, चौघांना अटक

बापरे! मोबाईल दुरुस्तीचा किरकोळ वाद, ग्राहकाच्या छातीत थेट गरम सळईच भोसकली
मुंबई : मोबाईल नीट दुरुस्त केला नाही म्हणून दुकानदाराकडे जाब विचारणे मानखुर्द मधील भावंडाच्या जीवावर बेतले आहेत. दुकानदाराने रागात जवळील कबाबच्या दुकानातील गरम सळई एकाच्या छातीत भोसकून हत्या केली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत चौघांंवर अटकेची कारवाई केली आहे.
पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, यात मानखुर्दच्या लोहार चाळीत राहणारा अकबर अली उर्फ यूसुफ मोहम्मद अली पठाण (२४) याची हत्या करण्यात आली आहे. अकबरने येथीलच जुबेर मोबाईल शॉपमधून मोबाईल दुरुस्त करून घेतला. मात्र दुरुस्तीनंतरही मोबाईल व्यवस्थित चालत नसल्याने त्याने सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भाउ मोहम्मद हुसेन सोबत मोबाईल दुकान गाठले. मोबाईल दुरुस्तीबाबत दुकानदाराकडे जाब विचारला. यात दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे, बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.
पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटकhttps://t.co/uMNe4a7xtb
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2021
याच रागात दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी शेजारील कबाबच्या दुकानातील गरम सळई अकबरच्या छातीत भोसकून, चाक़ूने त्याच्यावर वार केले. तर मोहम्मदला धक्काबुकी केली. घटनेची वर्दी लागताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. यात, अकबरचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अकबरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी मंगळवाऱी हत्येचा गुन्हा नोंदवत चौघांना अटक करण्यात आली आहे.
महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडाhttps://t.co/adW9HqHmd2
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2021