खळबळजनक! घरात एकटं असताना अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 16:58 IST2020-10-10T16:58:32+5:302020-10-10T16:58:49+5:30
Suicide : मानसिक स्वास्थ दिनाच्या दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने वाढत्या ताणतणावाचा प्रश्न समोर आला आहे.

खळबळजनक! घरात एकटं असताना अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे विपीन रामकृष्ण मोरे (१६) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मानसिक स्वास्थ दिनाच्या दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने वाढत्या ताणतणावाचा प्रश्न समोर आला आहे.
विपीन रामकृष्ण मोरे हा सकाळपासून घरीच होता. तर आईवडील हे शेतात कामाला गेले होते. त्याचा मोठा भाऊ हा देखील कामाच्या निमित्त बाहेर होता. घरात एकटे असताना अचानक दुपारी दीड वाजता छताला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी घराकडे धाव घेतली. विपीनचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. विपिनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. विपीन याच्या पश्चात आई, वडील, व ४ भाऊ असा परिवार आहे.