फोनवर बोलण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:54 IST2019-03-12T20:50:41+5:302019-03-12T20:54:07+5:30
अल्पवयीन आरोपींकडून चाकू हल्ला; दोघे जण जखमी

फोनवर बोलण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला हल्ला
मुंबई - फोनवर बोलण्यावरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलावर त्याच्या मित्रावर हल्ला केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात घडला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन आरोपींपैकी एकाने जखमी एैराब शेखला दूरध्वनी केला होता. त्यावेळी त्याने आपण बाहेर असून नंतर दूरध्वनी कर असे सांगितले. त्यावेळी शेख रागाने बोलत असल्याच्या वादातून दोन अल्पवयी आरोपी भावांनी त्याच्यावर चाकून हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी शेखचा मित्र समद खान(17) हा देखील आला. त्यावेळी त्यालाही चाकू लागला. पब जी व्हीडिओ गेम खेळण्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जात होते. पण पोलिसांनी त्याला नकार दिला आहे.