#MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:24 IST2018-10-13T18:17:01+5:302018-10-13T18:24:02+5:30

मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे. 

#MeToo: Nana Patekar's Narco Test; Demand for Tanushree Datta police | #MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी

#MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी

मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ता विनयभंगप्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह सह आरोपींची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करा अशी मागणी तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी अर्जाद्वारे ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. वकील नितीन सातपुते यांनी आज हा पत्रव्यवहार केला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे. 

#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट

Web Title: #MeToo: Nana Patekar's Narco Test; Demand for Tanushree Datta police