शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अरे देवा! गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्यासाठी मुलाकडून स्वत:च्या बापाची हत्या, १० लाखांची दिली होती सुपारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:12 AM

२ दिवसांपूर्वी कोळसा व्यापारी अरूण जैन यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ही ह्त्या कुणी केली याचा खुलासा झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्याच्या नादात एका तरूणाने त्याच्याच वडिलाच्या हत्येची सुपारी दिली. २ दिवसांपूर्वी कोळसा व्यापारी अरूण जैन यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपी मुलासोबत एकूण ३ लोकांना अटक केली. मुलाने वडिलाच्या हत्येसाठी १० लाख रूपयांची सुपारी दिली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना मेरठच्या ध्यानचंद नगरातील आहे. येथील कोळश्याने मोठे व्यापारी अरूण जैन यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. चेहरा झाकून आलेल्या काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

दिवसाढवळ्या घडवून आणलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी हत्याकांडाच्या खुलाशासाठी पोलिसांवर दबावही टाकला. त्यामुळे पोलिसांनी या केसच्या तपासासाठी अनेक टीम बनवल्या. त्यानंतर सर्व्हिलांस टीमने कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा सत्य समोर आलं. (हे पण वाचा : बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना)

बाप-लेकात होता वाद

पोलिसांनी या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर हत्याकांडावरील पडदा उठला. अरूण जैन यांचा मुलगा आयुष याला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न करायचं होतं. मात्र, त्याच्या वडिलांना दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावून द्यायचं होतं.   

यावरून बाप-लेकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलाच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि एक स्कूटी ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी