सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:37 IST2025-05-02T15:36:48+5:302025-05-02T15:37:19+5:30
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या सौरभ हत्याकांडाने देश हादरला. आता सौरभ राजपूतचे मारेकरी सध्या जेलमध्ये आहेत.

सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या सौरभ हत्याकांडाने देश हादरला. आता सौरभ राजपूतचे मारेकरी सध्या जेलमध्ये आहेत. मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिलची जेलमध्ये अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यांना वाटत होतं की, त्यांना जामीन मिळेल. पण जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. यामुळे साहिल आणि मुस्कान निराश झाले आणि ढसाढसा रडले. जेल अधीक्षकांना ते विनंती करत राहिले. आमची सुटका करा असं ते म्हणत होते.
हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली नाही. हत्या प्रकरणाची सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. मुस्कान आणि साहिल यांनी वरिष्ठ जेल अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांची भेट घेतली आणि लवकर जामीन मिळावा अशी मागणी केली. याच दरम्यान, मुस्कान आणि साहिल रडू लागले. जेल अधीक्षकांनी या संदर्भात त्यांना सरकारी वकिलांशी बोलण्यास सांगितलं आहे.
सौरभ हत्येप्रकरणात जेलमध्ये असलेली मुस्कान इतर दोन महिला कैद्यांसह वरिष्ठ जेल अधीक्षकांना भेटण्यासाठी पोहोचली. ती हात जोडून उभी राहिली आणि रडू लागली. साहेब, कृपया मला जामीन मिळवून द्या असं म्हणाली. साहिल ही जामिनासाठी रडत जेल अधीक्षकांनाही भेटला. जेलच्या नियमावलीनुसार त्यांना सरकारी वकील देण्यात आला आहे. जामिनासाठी फक्त सरकारी वकीलच न्यायालयात आपला युक्तिवाद मांडतील.
मुस्कान रस्तोगी गर्भवती असल्याने तिला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवलं आहे. जेल नियमावलीतील तरतुदींनुसार, गर्भवती महिला कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. महिला कैदी संगीतालाही मुस्कानसोबत त्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारण अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्येही ती गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या कैद्यांना विशेष डाएट, आवश्यक औषधं आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.